भाजप नगरसेविकेच्या पतीविरुद्ध अपशब्द ; आ. सत्तारविरुद्ध तक्रार दाखल

Foto
सिल्‍लोड । नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूक निकालानंतर आ. अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे भाजप नगरसेविकांविरुद्ध अपशब्द वापरल्याने नगरसेविकेच्या सासूने दिलेल्या तक्रारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे हे करीत आहेत. 

या पूर्वीही आमदार सत्तार यांनी शेतीच्या वादावरून झालेल्या भांडणात देव देवतांच्या नावांचा उल्लेख करून शिवीगाळ केली होती. त्यावेळी सर्व हिंदुत्वादी संघटनाही एकत्र येऊन सत्तर यांच्य विरुद्ध तक्रार दिली होती. सत्तार हे नेहमीच वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत आहेत.  सिल्‍लोड नगरपरिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांनी २६ पैकी २४ जागा जिंकत मोठ्या मताने नगराध्यक्षपद जिंकून आणले. विजयानंतर आ.सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नगरपरिषदेतील विजयाबद्दल बोलताना म्हणाले की, आमचे २४ सदस्य निवडून आले असून, भाजपचे जे दोन नगरसेवक निवडून आले. त्यापैकी एक आमच्या पक्षातील गद्दार असून, आमचीच अवैध औलाद आहे, असे वादग्रस्त विधान केले. भाजपतर्फे निवडून आलेल्या अश्‍विनी किरण पवार यांचे पती किरण पवार हे काँग्रेस पक्षाकडून निवडून नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेतला व पत्नीला भाजपच्या तिकीटावर निवडून आणले. त्याचा रोष आ. सत्तारांना असल्याने त्यांनी हे अपशब्द वापरले. या प्रकरणी ताईबाई छगन पवार यांनी सिल्‍लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker